" I embraced yoga and meditation wholeheartedly 28 years ago. My journey has been extremely fascinating, enriching, fulfilling, and surreal. This course is a humble effort to share with you a few pearls of yogic wisdom that you might find helpful in your yogic pursuit.
-- Bipin Joshi
Software Consultant | Meditation Teacher



Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for mental peace, improved focus, and blissful inner connection.

Dates | 1, 8, 15, 22, 29 April 2023
Timings | 8:30 AM -- 10:30 AM (IST)
Fees | Rs. 2,500 per person


Ajapa Yoga -- Kriya and Meditation Online Course

अनया सदृशी विद्या अनया सदृशो जपः ।
अनया सदृशं ज्ञानं न भूतं न भविष्यति ॥
~ योगचूडामणी उपनिषद
No learning higher than Ajapa, no japa higher than Ajapa, no knowledge higher than Ajapa ever existed in the past nor will exist in the future.
~ Yogachudamani Upanishad
Ajapa Yoga is an ancient technique of meditation and mindfulness that takes your mind into deep meditative states quickly and effectively. Ajapa is the crest jewel of Yoga Vidnyana and is an important practice mentioned in many prominent ancient yogic scriptures.

Kriya and meditation as taught by Bipin Joshi is built on the foundations of time proven principles of Ajapa Yoga and the classical yoga system of India. You learn a powerful sequence of Kriyas consisting of breathing patterns, mantras, mudras, and meditations knitted together to maximize the benefits. Together this sequence helps the practitioner purify the energy channels, calm the mind, open the Chakras and awaken the Kundalini leading to spiritual transformation.

Experience the inner fountain of bliss. Understand the metaphysics and cosmic connection of Chakras and Kundalini. Online course, guidance, and mentoring for individuals and small groups.

Manage stress and work pressures
Become more productive and energetic
Promotes healing and rejuvenation
Open Chakras and awaken Kundalini
Foundation for spiritual transformation




मानवी जन्माचं सार्थक करण्याचे जे अध्यात्म मार्ग भारतवर्षात विकसित झाले त्यातील एक प्रमुख मार्ग म्हणजे कुंडलिनी योग. मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग अशा चार प्रकारांत विभागलेला हा मार्ग खरंतर आध्यात्मिक प्रगतीचा राजमार्गच आहे. अजपा योग हा ह्या सगळ्यांचा मुकुटमणी आहे. प्राचीन योगग्रंथांनी एकमुखाने गौरवलेली ही "न भूतो न भविष्यति" अशी साधना पध्दती आहे. ताणतणावांनी आणि नाना प्रकारच्या चिंतांनी ग्रस्त करणाऱ्या आधुनिक जीवनशैलीसाठी तर अजपा योग वरदान स्वरूप आहे. तुम्हाला ह्या मार्गावर यावं अशी इच्छा होत आहे हा तुमच्या दृष्टीने मोठा शुभसंकेतच आहे. विषयाच्या खोलात जाण्याआधी अंतरीचे दोन शब्द सांगावे म्हणून हा "मनोगत" प्रपंच.




देवाच्या डाव्या हाती
कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. एक नवखा साधक ते योगी या प्रवासात लेखकाला आलेल्या अडचणी आणि त्याने मोठ्या जिद्दीने त्यांवर केलेली मात याचे प्रभावी वर्णन या पुस्तकात आढळते. विस्मयकारक स्वानुभव आणि प्रभावी मार्गदर्शना बरोबरच कुंडलिनी योगशास्त्रा विषयी बहुमुल्य माहिती आणि सुबोध विवरण. अधिक वाचण्यासाठी येथे जा.
नाथ संकेतींचा दंशु
कुंडलिनी योगमार्ग विनाकारण गुढतेच्या आणि क्लिष्टतेच्या वलयात झाकोळला गेला आहे. सर्वसामान्य संसारी साधक कुंडलिनी योगमार्गापासून दूरच राहिला आहे. सर्वसामान्य साधकाला समजतील, जमतील आणि फायदा मिळवून देतील अशी मूलतत्वे आणि साधना यांचे सहज सोप्या भाषेत विश्लेषण करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दीष्ट आहे. अजपा योग, जप साधना, योग्यांचे यम-नियम, सुलभ शिवोपासना इत्यादी उपयुक्त गोष्टींसह प्रभावी आणि स्वानुभवाधिष्ठित मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी येथे जा.


Latest Yoga and Spirituality Articles

मूलाधार, मणिपूर आणि आज्ञा चक्रांतील तेजोध्यान अथवा ज्योतीर्ध्यान
लेखमालेत आत्ता पर्यंत आपण घेरंड मुनींनी विषद केलेल्या स्थुलध्यानाच्या दोन पद्धती जाणून घेतल्या आहेत. आता घेरंड मुनी आपल्याला तेजोध्यानाच्या अथवा ज्योतीर्ध्यानाच्या काही पद्धती सांगत आहेत. नावावरून तुमच्या लक्षात आहे असेल की या पद्धतींत प्रकाश किंवा तेज हा ध्यानाचा प्रधान विषय आहे.
Posted On : 24 Mar 2023
योगजीवनातील काही मुलभूत धडे
महाशिवरात्रीमुळे गेले काही आठवडे घेरंड संहिते वरील लेखमाला काहीशी बाजूला पडली होती. महाशिवरात्रीचे पावन पर्व तुम्हा सर्वांनी आपापल्यापरीने आनंदात आणि उत्साहात साजरे केले असणार याची मला खात्री आहे. घेरंड संहितेवरील रेंगाळलेली लेखमाला पुन्हा सुरु करण्याची वेळ आता आली आहे. आतापर्यंत आपण स्थूल ध्यानाविषयी घेरंड मुनींचे विचार जाणून घेतले आहेत.
Posted On : 13 Mar 2023
अजपा अखंडनामाची योगमय क्लुप्ती
आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर एक गोष्ट सांगणार आहे. काटेकोर भिंगातून पाहायचं म्हटलं तर ही गोष्ट तशी काल्पनिकच म्हणावी लागेल परंतु कुठेतरी खोलवर तिला सत्यतेचा स्पर्श आहे. काल्पनिक की सत्य याबद्दल फार चिकित्सक वृत्ती न दाखवता गोष्टीच्या मूळ गाभ्याकडे लक्ष द्यावे म्हणजे खरे मर्म हाती लागेल.
Posted On : 18 Feb 2023
शिवषडाक्षर महामंत्राचा विनियोग, न्यास इत्यादी सहित जप
काही आठवडे आपण महाशिवरात्री बद्दल माहिती घेत आहोत. मागच्या लेखात आपण शिवषडाक्षर महामंत्राचे महात्म्य जाणून घेतले. पारंपारिक पद्धतीनुसार कोणत्याही मंत्राचा जप करतांना पंचोपचार पूजन, ध्यान, विनियोग, न्यास वगैरे गोष्टी केल्या जातात. आधुनिक काळात बरेच साधक हे सर्व सोपस्कार न करता फक्त मंत्राचा जपच करतात. ज्यांना ह्या गोष्टींत रस आहे आणि त्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी आजचा लेख उपयोगी पडेल अशी आशा आहे.
Posted On : 10 Feb 2023
महाशिवरात्री २०२३ निमित्त षडाक्षर महामंत्रा विषयी सहा बिंदू
घेरंड संहितेवरील लेखमालेला अल्पसा विराम देऊन आपण महाशिवरात्री बद्दल काही गोष्टी जाणून घेत आहोत. सर्व शिवभक्त महाशिवरात्री २०२३ साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत. पंचाक्षर अथवा षडाक्षर मंत्र हा भगवान शंकराचा मूलमंत्र. या मंत्राचा महिमा वर्णन सरस्वतीही पूर्णपणे करू शकणार नाही तेथे सामान्य माणसाची तर गोष्टच सोडा. तरीही आजच्या माघ पौर्णिमेच्या आणि रवि पुष्य योगाच्या शुभ दिनी शिव षडाक्षर मंत्राविषयी हे सहा बिंदू सदाशिवाला स्मरून सांगत आहे.
Posted On : 05 Feb 2023
महाशिवरात्री २०२३ निमित्त अजपा ध्यानसाधना
या वर्षी महाशिवरात्री दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी होणार आहे. एखादा सण, उत्सव किंवा पर्व साजरे करण्याच्या विविध पद्धती असतात. जो-तो आपापल्या श्रद्धेनुसार मार्ग चोखाळत असतो. योगमार्गी साधकांसाठी योगक्रियांचा वापर करून हे पर्व कसे साजरे करता येईल त्याविषयी दोन शब्द.
Posted On : 30 Jan 2023
स्थूल ध्यानाचा दुसरा प्रकार
मागील लेखात आपण घेरंड मुनींनी विषद केलेला स्थूल ध्यानाचा पहिला प्रकार जाणून घेतला. हा पहिला प्रकार योगमार्गावर नवीन असलेल्या साधकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अनाहत चक्रात आपल्या इष्ट देवतेचे गुरूच्या निर्देशानुसार ध्यान करणे असे या प्रथम प्रकाराचे स्वरूप आहे. हे ध्यान पक्व झाले की स्थूल ध्यानाच्या काहीशा प्रगत अशा या दुसऱ्या प्रकाराकडे जाता येईल. स्थूल ध्यानाचा हा दुसरा अभ्यास नेमका काय आहे ते या लेखात आपण जाणून घेऊ.
Posted On : 15 Jan 2023
स्थूल ध्यानाचा पहिला प्रकार
मागील लेखात आपण घेरंड मुनींच्या कुंडलिनी ध्यानयोगाचे तीन प्रकार अर्थात स्थूलध्यान, ज्योतिर्ध्यान आणि सूक्ष्मध्यान जाणून घेतले. अजपा ध्यानात ते तीनही कसे समाविष्ट होतात ते ही आपण थोडक्यात जाणून घेतले. आता घेरंड मुनी आपल्याला स्थूल ध्यानाचे दोन विशिष्ठ विधी सांगत आहेत. खरंतर स्थूलध्यानाचे अनेकानेक प्रकार आहेत परंतु येथे घेरंड मुनी आपल्याला त्यांच्या मतानुसार महत्वाचे असे दोन विधी वानगी दाखल विषद करत आहेत. त्यांतील पहिला प्रकार आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
Posted On : 01 Jan 2023
श्रीदत्त जयंती २०२२ निमित्त चंद्राच्या सोळा कला
गेल्या काही आठवड्यांपासून घेरंड संहितेवरील लेखमाला सुरु केली आहे. त्यामुळे आजही त्याचाच पुढचा भाग प्रकाशित करण्याचा विचार होता. पहाटे पहाटे श्रीदत्तात्रेयांची प्रेरणा झाली की आजच्या दिवशी कुंडलिनी योगमार्वावर अग्रेसर असलेल्या अनुभवी साधकांसाठी "शिव साधने" विषयी काहीतरी लिहावे. श्रीदत्त गुरूंची प्रेरणा म्हणजे आज्ञाच.
Posted On : 07 Dec 2022
घेरंड मुनींनी विषद केलेले ध्यानाचे तीन प्रकार
मागील लेखात आपण घेरंड मुनींच्या कुंडलिनी ध्यानयोगाची थोडक्यात ओळख करून घेतली. एकूण ध्यान प्रक्रियेची घेरंड मुनींनी ध्यान आणि समाधी अशा दोन भागात विभागणी केलेली आहे हे ही आपण जाणून घेतले. ध्यान आणि समाधी यांचे उद्दिष्ठ काय आहे त्याविषयीचे घेरंड मुनींचे मतही आपण जाणून घेतले. आता पुढे जाऊन घेरंड मुनींची ध्यान पद्धती जाणून घेऊया. ती अभ्यासत असतांना अजपा योगाच्या अनुषंगाने काही सूक्ष्म गोष्टींचा उहापोह करण्याचा यत्नही करूयात.
Posted On : 28 Nov 2022