योग - अध्यात्म

12345678910...Last
परमात्म्याकडे नेणारे सहा समाधी मार्ग
घेरंड मुनींनी आपल्याला समाधी म्हणजे काय ते सांगितले आहे. गुरुकृपा आणि गुरुभक्ती समाधी लाभासाठी कशी आवश्यक आहे ते सुद्धा आपण जाणून घेतले आहे. आता ही समाधी स्थिती प्राप्त कशी करायची त्याचे सहा यौगिक प्रकार ते सांगणार आहेत.
Posted On : 05 Jun 2023
समाधी प्राप्तीसाठी गुरुकृपेची आणि गुरुभक्तीची आवश्यकता
घेरंड मुनींनी आतापर्यंत आपल्याला ध्यानयोग सांगितला आहे. आता ते ध्यानातून समाधीकडे जाणार आहेत. मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी त्यांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे निर्देश केलेला आहे.
Posted On : 29 May 2023
निर्वाण षटक अर्थात शिवस्वरूप आत्मतत्वाची अनुभूती
घेरंड संहितेवरील लेखमालेत आतापर्यंत आपण ध्यानाचे तीन स्तर जाणून घेतले आहेत. ध्यानाचा हा सगळा खटाटोप हा आत्मसाक्षात्कारासाठी आहे हे ही आपण जाणून घेतले आहे. ध्यानाचा टप्पा गाठल्यानंतर आता घेरंड मुनी समाधी आणि मोक्ष या अंतिम टप्प्या विषयी काही सांगणार आहेत. ते काय म्हणतात ते जाणून घेण्यापूर्वी आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष यांविषयी काही गोष्टींची उजळणी करणे क्रमप्राप्त आहे.
Posted On : 15 May 2023
शंभूजती गोरक्षनाथ अयोनिसंभव अवतरण
ज्या परम दयाळू परमेश्वराने चौऱ्यांशी लक्ष योनींची टाकसाळ सुरु केली तोच या सृष्टीची देखभाल सुद्धा करत असतो. या देखाभालीचाच एक भाग म्हणून मानव जातीच्या उद्धारासाठी तो वेळोवेळी संत, सत्पुरुष निर्माण करत असतो.
Posted On : 04 May 2023
अक्षय तृतीया -- विशेष शिव उपासना
आज अक्षय तृतीया आहे. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज एक शिव उपासना आपण जाणून घेणार आहोत. ही उपासना करण्यासाठी तुम्हाला काही साहित्य लागणारा आहे. शुद्ध पाणी, थोडंसं नागकेसर, फुलं, दीप, धूप अशा गोष्टी लागतील. अर्थात एखादी गोष्ट नसेल तर उगाच बाऊ करण्याची गरज नाही. जे काही मिळेल, सहज उपलब्ध होईल ते साहित्य जमवा.
Posted On : 22 Apr 2023
शांभवी मुद्रेद्वारे कुंडलिनी शक्तीचे सूक्ष्म ध्यान
मागील लेखात आपण घेरंड मुनींनी विषद केलेला तेजोध्यानाच्या तीन पद्धती जाणून घेतल्या. स्थूल आणि तेजोध्यान कथन केल्यावर घेरंड मुनी आता आपल्याला सूक्ष्म ध्यानाविषयी सांगत आहेत.
Posted On : 06 Apr 2023
मूलाधार, मणिपूर आणि आज्ञा चक्रांतील तेजोध्यान अथवा ज्योतीर्ध्यान
लेखमालेत आत्ता पर्यंत आपण घेरंड मुनींनी विषद केलेल्या स्थुलध्यानाच्या दोन पद्धती जाणून घेतल्या आहेत. आता घेरंड मुनी आपल्याला तेजोध्यानाच्या अथवा ज्योतीर्ध्यानाच्या काही पद्धती सांगत आहेत. नावावरून तुमच्या लक्षात आहे असेल की या पद्धतींत प्रकाश किंवा तेज हा ध्यानाचा प्रधान विषय आहे.
Posted On : 24 Mar 2023
योगजीवनातील काही मुलभूत धडे
महाशिवरात्रीमुळे गेले काही आठवडे घेरंड संहिते वरील लेखमाला काहीशी बाजूला पडली होती. महाशिवरात्रीचे पावन पर्व तुम्हा सर्वांनी आपापल्यापरीने आनंदात आणि उत्साहात साजरे केले असणार याची मला खात्री आहे. घेरंड संहितेवरील रेंगाळलेली लेखमाला पुन्हा सुरु करण्याची वेळ आता आली आहे. आतापर्यंत आपण स्थूल ध्यानाविषयी घेरंड मुनींचे विचार जाणून घेतले आहेत.
Posted On : 13 Mar 2023
अजपा अखंडनामाची योगमय क्लुप्ती
आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर एक गोष्ट सांगणार आहे. काटेकोर भिंगातून पाहायचं म्हटलं तर ही गोष्ट तशी काल्पनिकच म्हणावी लागेल परंतु कुठेतरी खोलवर तिला सत्यतेचा स्पर्श आहे. काल्पनिक की सत्य याबद्दल फार चिकित्सक वृत्ती न दाखवता गोष्टीच्या मूळ गाभ्याकडे लक्ष द्यावे म्हणजे खरे मर्म हाती लागेल.
Posted On : 18 Feb 2023
शिवषडाक्षर महामंत्राचा विनियोग, न्यास इत्यादी सहित जप
काही आठवडे आपण महाशिवरात्री बद्दल माहिती घेत आहोत. मागच्या लेखात आपण शिवषडाक्षर महामंत्राचे महात्म्य जाणून घेतले. पारंपारिक पद्धतीनुसार कोणत्याही मंत्राचा जप करतांना पंचोपचार पूजन, ध्यान, विनियोग, न्यास वगैरे गोष्टी केल्या जातात. आधुनिक काळात बरेच साधक हे सर्व सोपस्कार न करता फक्त मंत्राचा जपच करतात. ज्यांना ह्या गोष्टींत रस आहे आणि त्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी आजचा लेख उपयोगी पडेल अशी आशा आहे.
Posted On : 10 Feb 2023
12345678910...Last