Pinned Articles

श्रीदत्त जयंती २०२२ निमित्त चंद्राच्या सोळा कला
गेल्या काही आठवड्यांपासून घेरंड संहितेवरील लेखमाला सुरु केली आहे. त्यामुळे आजही त्याचाच पुढचा भाग प्रकाशित करण्याचा विचार होता. पहाटे पहाटे श्रीदत्तात्रेयांची प्रेरणा झाली की आजच्या दिवशी कुंडलिनी योगमार्वावर अग्रेसर असलेल्या अनुभवी साधकांसाठी "शिव साधने" विषयी काहीतरी लिहावे. श्रीदत्त गुरूंची प्रेरणा म्हणजे आज्ञाच.
Posted On : 07 Dec 2022
भगवान दत्तात्रेयांची कृपा देणारे श्रीदत्त षटक स्तोत्र
फार वर्षांपूर्वीची गोष्ट. मी श्रीनृसिंहवाडी अर्थात नरसोबाची वाडी येथे काही काळ राहिलो होतो. कृष्णा पंचगंगा संगमी वसलेल्या या ठिकाणाचे महत्व दत्तभक्तांना निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. एक दिवस नामस्मरण करता करता असा विचार मनात आला की एकाच नावाने भगवंताला आळवण्यापेक्षा वेगवेगळ्या नामांनी त्याला साद घालावी. मग काय जी आठवतील, जी स्फुरतील त्या नामांचा पुकारा सुरु केला. काही काळ हे असे नामस्मरण करून उठण्याच्या तयारीला लागतो.
Posted On : 19 Dec 2021
अनाहत नाद प्रकट होण्यास सहाय्यक श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्र
अनेक वर्षांपूर्वी मी "श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्रमंत्र" नामक एका स्तोत्राची रचना केली होती. श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्राच्या उपासनेद्वारे नादश्रवणाच्या अभ्यासाला बळकटी कशी द्यायची हा एक स्वतंत्र योगगम्य विषय आहे. या लेखात त्याविषयाच्या खोलात जाण्याचा मानस नाही परंतु श्रीकुंडलिनी नादब्रह्म स्तोत्र सर्वच योगाभ्यासींना आवडेल आणि उपयोगी पडेल अशी आशा वाटल्याने या लेखात ते देत आहे.
Posted On : 07 Oct 2021
सहज खेचरीत स्फुरलेले श्रीसुषुम्ना स्तवन
आज श्रावण मासारंभ होत आहे. काही वर्षांपूर्वी श्रावणातच एका निवांत वेळी "सहज खेचरीत" निमग्न असतांना स्फुरलेले आणि शब्दबद्ध केलेले "श्रीसुषुम्ना स्तवन" आज प्रस्तुत करत आहे. प्राचीन योगग्रंथांत सुषुम्नेला ज्या विविध नावांनी ओळखले जाते त्यांतील सात नावांची गुंफण या स्तवनात आहे.
Posted On : 09 Aug 2021
अजपाने शिकवलं की...
आजचा गुरुपौर्णिमेचा उत्सव सर्वजण आपापल्या श्रद्धेनुसार साजरा करत आहेत. योग-अध्यात्माच्या क्ष्रेत्रात गुरुचे असलेले महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे त्याविषयी मी आज फारसं काही सांगणार नाही.
Posted On : 23 Jul 2021
अजपा गायत्रीचे षडाक्षर स्वरूप
खरंतर आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने काही लिहावं वगैरे असा अजिबात विचार नव्हता. काल काही जुन्या स्टुडंटसशी बातचीत झाली आणि त्यांनी आग्रह केला. तरीही इच्छा झाली नाही पण त्यानंतर मनात विचार रेंगाळत राहिला. लिहिण्याची प्रेरणा काही केल्या होत नव्हती. लिहिण्यासारखं तर खुप होतं पण आंतरिक ऊर्मी जाणवत नव्हती. त्यामुळे भगवान शंकरालाच साद घातली. त्याला म्हटलं - "योगीश्रेष्ठा! तूच मला अजपा, कुंडलिनी, योग वगैरे गोष्टींचे बाळकडू पाजले आहेस. तुझा खास दिवस आहे तेंव्हा आता तूच माझ्याकडून दोन शब्द लिहवून घे."
Posted On : 11 Mar 2021
अनंताच्या गाभाऱ्यात
अनंताच्या गाभाऱ्यात शाश्वताची फुले अनाहताचे धुंद कवाड दशमद्वारी खुले उन्मनीतील मन निःशब्द होऊनी डुले सांजवेळच्या आभाळात आनंद भैरवी झुले
Posted On : 19 Mar 2018
योग म्हणजे...
स्वतःच स्वतःची गळाभेट घेणं म्हणजे योग. त्रिगुणांची वस्त्रे फेडून आत्म्याला सहज स्थितीत पहाणं म्हणजे योग. जन्मोजन्मींचे संस्कार धुवून निजबोध घेणं म्हणजे योग.
Posted On : 20 Mar 2017
श्री देवी स्तवन
श्री देवी स्तवन
Posted On : 10 Aug 2010