अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

पिंडाने पिंडाचा नाश

पिंडाने पिंडाचा ग्रास घेणे हा नाथ संप्रदायाचा सिद्धान्त आहे. हा मार्ग जरी शंकराने दाखवलेला असला तरी त्याचे वर्णन विष्णुने (श्रीकृष्णाने) येथे केले आहे.
~ ज्ञानेश्वरी
शैव दर्शन आणि नाथ संप्रदाय अध्यात्माकडे वेगळ्या दृष्टीने पाहते. अन्य विचारधारा सर्वसाधारणपणे साधकाच्या मनावर असे बिंबवतात की मानवी शरीर हे नश्वर असल्याने अतिशय निंदनीय, कमी योग्यतेचे आणि टाकाऊ आहे. नाथ संप्रदाय असे अव्यवहार्य कथन करत नाही. नाथ संप्रदायानुसार शरीर जरी नश्वर असले तरी ते फार महत्वाचे आहे कारण त्याच्याच सहायाने चांगल्या-वाईट कर्मांची मोट वळली जाते. पिंड हा नाथ संप्रदायाचा सांकेतिक आणि खोल अर्थ असलेला शब्द आहे. पिंड म्हणजे केवळ जड शरीर नाही तर शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार याचा समुच्चय. नाथ योगी या पिंडाचा वापर करून पिंडाच्या पलीकडले तत्व हस्तगत करत असतो. त्यामुळे पिंडाने पिंडाचा ग्रास करायचा हा नाथ सिद्धान्त आहे. मराठीत "पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी" ही म्हण आहे ती त्याच अर्थाने. कुंडलिनी योग आणि नाथ संप्रदाय हा शंकर प्रणीत मार्ग आहे पण त्याची थोरवी अशी की श्रीकृष्णारूपातील विष्णुसुद्धा तो मार्ग अर्जुनाला आचरण्यास सांगत आहे.



लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 15 December 2014