अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

प्राण आणि मन यांचा विलय आवश्यक

जोवर प्राण चालत आहेत आणि मन जीवंत आहे तोवर ज्ञान कसे प्राप्त होणार? जो प्राण आणि मन यांचा विलय साधतो तोच मुक्त होतो. अन्य कोणीही नाही.
~ हठयोग प्रदीपिका (अध्याय चौथा)
विविध योगसाधनांचा सूक्ष्म अभ्यास केल्यास असे आढळते की त्यांचे उद्दीष्ट एकतर प्राणावर ताबा मिळवणे हे आहे किंवा मनावर ताबा मिळवणे आहे. कुंडलिनी योगमार्गावर या दोनही तत्वांवर हळूहळू ताबा मिळवला जातो. प्राणावर ताबा मिळवण्यास प्राणायाम हा मुख्य उपाय आहे तर मनावर ताबा मिळवण्यास ध्यान हा मुख्य उपाय आहे. अजपा साधनेत या दोनही प्रकारांचा सुंदर मिलाफ आपल्याला दिसून येतो. जोवर प्राण किंवा मन सूक्ष्म स्तरावर जागृत आहेत तोवर साधकाला समाधी अवस्था पूर्णत्त्वाने साधत नाही. जेव्हा प्राणशक्ति आणि मन:शक्ती आदिशक्तिमध्ये विलीन होतात तेव्हाच साधकाला मुक्ति मिळते.



लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 17 November 2014