अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

शिव आणि शक्ति एकमेकापासून अभिन्न

न शिवः शक्तिरहितो न शक्तीर्व्यतीरेकिणी।
शिवः शक्तस्तथा भावानिच्छया कतुर्मीहते॥
शिव कधीही शक्तिरहित असत नाही. शिव आणि शक्ति ही नावे जारी वेगळी असली तरी ती अभिन्न आहेत. हा शैवदर्शनाचा एक महत्वाचा मूलभूत सिद्धान्त आहे. काही वेदांती ब्रह्म आणि माया ही जोडगोळी एकमेकापासून वेगवेगळी दर्शवतात. ब्रह्म ते खरं आणि माया ती खोटी असा मायावाद्यांचा दावा असतो. शैवदर्शन मात्र तसे मानत नाही. शिव खरा आणि शक्तीही खरीच आहे. फरक एवढाच आहे की शिव हा निर्गुण आहे तर शक्ति ही सगुण आहे. चंद्र आणि चांदणे, ज्योत आणि प्रकाश हे जसे अभिन्न आहेत त्याचप्रमाणे शिव आणि शक्ति यांचे नाते आहे. शक्तीचा "नाथ" शिवच आहे. म्हणूनच शिव "शक्तिमान" अर्थात शक्तीला धारण करणारा आहे. या शक्तीच्या आधारानेच शिव संपूर्ण विश्वाचे संचलन करत असतो.



लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 05 January 2015