Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ निमित्त बर्फाच्या शिवलिंगावर साधना

शंभू महादेव जरी माझा सर्वेसर्वा मायबाप असला तरी श्रीकृष्णाचे आणि माझे एक वेगळे नाते आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मुळे हे नाते अधिकच घट्ट विणले गेले आहे. तुम्ही जर कधी तर शिवमहापुराण वाचले असेल तर तुम्हाला श्रीकृष्णाच्या शिवभक्ती विषयी माहिती असेलच. वायवीय संहितेत उपमन्यु ऋषींकडून श्रीकृष्णाला विस्ताराने शिवज्ञान, शैव दीक्षा, दीक्षेचे प्रकार वगैरे वगैरे गोष्टींचा उपदेश झालेला आहे. कधीतरी त्याविषयी जाणून घेऊ पण आज सांगायची गोष्ट म्हणजे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी झालेला श्रीगुरुमंडलाचा आदेश.

या आठवड्यातील सोमवार निज श्रावणातील तिसरा सोमवार होता. नेहमीप्रमाणे शंभू महादेवाची भस्मपूजा करत असतांना श्रीगुरुमंडलाचा आदेश झाला की या श्रीकृष्ण जन्माष्टमीला मोहरात्री बर्फाच्या शिवलिंगावर साधना करावी. एवढ्या कमी कालावधीत छान सुबक असे बर्फाचे शिवलिंग बनवणे शक्यच नव्हते परंतु श्रीगुरुमंडलाच्या कृपेने यथामती आणि यथाशक्ती आज्ञापालन झाले.

मला आशा आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री अर्थात "मोहरात्री" तुम्ही सुद्धा तुमच्या श्रद्धेनुसार साधना, उपासना नक्की केली असणार.

असो.

मेरुदंडातील कैलास शिखर, दत्त शिखर आणि गोरक्ष शिखर यांवर डौलाने विराजमान असणारे श्रीगुरुमंडल सर्व योगाभ्यासी वाचकांना योगमार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 07 September 2023