|
|
भगवान दत्तात्रेयांचा योगोपदेश |
|
जाबालदर्शन उपनिषद म्हणजे योगीराज दत्तात्रेय आणि त्यांचा सांकृति नामक शिष्य यांमधील संवाद. हे उपनिषद दहा खंडात विभागलेले असून त्यामध्ये अष्टांग योग विस्ताराने वर्णन केला आहे. दत्तात्रेयांच्या अष्टांग योगाचे उद्दीष्ट शिवपदाची प्राप्ती हे आहे. दत्तात्रेयांचा योगपद्धतीवर कुंडलिनी योगमार्गाची विलक्षण छाप आहे हे या उपनिषदावरून लगेच लक्षात येते. यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांबरोबरच शरीरस्थ नाड्या, प्राणाचे उपप्रकार इत्यादी गोष्टींचे वर्णन दत्तात्रेय आपल्या शिष्याला करताना आढळतात. अवधूत गीतेप्रमाणेच येथेही शिव हाच सर्वभूतांत वास करणारा आत्मा आहे हे तत्व जागोजागी कथन केलेले आढळते. आता या उपनिषदातील प्रत्येक खंडाविषयी थोडक्यात माहिती घेऊ. |
|
Posted On : 09 Dec 2011 |
|
|
सुखसमृद्धीसाठी श्रीयंत्र |
|
मानवी आयुष्य अधिकाधिक सुखी असावे अशी इच्छा असणे ही काही नवी गोष्ट नाही. किंबहुना मानवाच्या अस्तित्वाबरोबरच ही इच्छा मानवी संस्कृतीचा एक महत्वाचा घटक बनून राहिली आहे. 'इच्छा तेथे मार्ग' या उक्तीप्रमाणे मानवाने सुखी होण्याचे अनेक मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलेले आहेत. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाला भरभरून भौतिक सुखे प्रदान करत आहेत. प्राचीन काळीही असे अनेकानेक प्रयत्न झालेले आढळतात. या प्रयत्नांचाच भाग म्हणून प्राचीन योग्यांनी अशा काही उपासना प्रचलित केल्या ज्या मानवी आयुष्यातील नकारात्मक गोष्टी दूर करून मानवाला सुख, समृद्धी प्रदान करण्यात फायदेशीर ठरतात. अशीच एक उपासना पद्धती म्हणजे - श्रीयंत्र साधना. |
|
Posted On : 17 Oct 2011 |
|
|
... आणि कृष्ण हसला |
|
नंदाघरी खूप धावपळ सुरू होती. नुकतेच घरात बाळकृष्णाचे आगमन झाले होते. यशोदा मातेला तर जराही फुरसत नव्हती. आपल्या घरी साक्षात विष्णुने अवतार घेतला आहे याची तीच्यातील मातेला कल्पनाही नव्हती. तान्ह्या कृष्णाला कुठे ठेवू अन कुठे नको असे तीला झाले होते. शंकर आणि विष्णु एकमेकाचे जीवाभावाचे मित्र. विष्णूने कृष्णावतार घेतला आहे हे कळताच शंकराला रहावले नाही. कृष्णरूपातला विष्णु कसा दिसतो ते प्रत्यक्ष बघण्यासाठी तो नंदाघरी गेला. |
|
Posted On : 22 Aug 2011 |
|
|
पिंगला वेश्येची कथा |
|
पिंगला नामक एक वेश्या विदेह नगरीत राहून शरीरविक्रय करून आपला उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी नेहमीप्रमाणे चेहर्याला रंगरंगोटीकरून, चांगली वस्त्रेप्रावरणे नेसून पिंगला आपल्या गिर्हाईकाची वाट पहाट बसली. मनात 'आज एखादे श्रीमंत गिर्हाईक मिळेल' असे इमले ती बांधत होती. तीच्या दुर्दैवाने बराच वेळ झाला तरी कोणीही तीच्याकडे फिरकले नाही. दर थोड्या वेळाने ती आत जाई, आपला चेहरा नीट आहे ना ते आरशात निरखून पाही आणि परत दारात येऊन बसे. प्रत्येक येणारा माणूस आपल्याकडेच येत आहे... |
|
Posted On : 13 May 2011 |
|
|
शैव दर्शन आणि एक गुराखी |
|
प्राचीन काळापासून हिमालय योग्यांचे वसतीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात कैलास म्हणजे तर साक्षात श्रीशंकराचे निवासस्थान मानले गेले आहे. याच कैलास पर्वताच्या अंगाखांद्यावर खेळलेला एक योगी सुंदरार किंवा सुंदरनाथ. अतिशय उच्च कोटीचा शैव सिद्ध. एकदा त्याला आपला मित्र अगस्त्यार याला भेटण्याची इच्छा झाली. अगस्त्यारचे वास्तव्य दक्षिणेकडे होते तेव्हा सुंदरनाथ कैलासावरून दक्षिणेला जायला निघाला. |
|
Posted On : 02 Mar 2011 |
|
|
प्राचीन कालगणना |
|
अजून एका वर्ष काळाच्या पडद्याआड होत आहे. आज आपल्याकडे काळ मोजण्याची घडाळ्यासारखी अचूक साधने उपलब्ध आहेत. प्राचीन काळी अशी कुठलीच साधने नव्हती. तरीही प्राचीन ऋषीमुनींनी कालमान मोजण्याची परिभाषा विकसित केली होती. आज आपल्याला त्यांची परिमाणे अगदीच जुनीपुराणी वाटतील पण आजच्यासारखी कोणतीही वैज्ञानिक साधने उपलब्ध नसताना त्यांनी कालमापन करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच महत्वाचा आहे. या प्राचीन कालगणनेवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कुतूहल किंवा गम्मत म्हणून तरी प्राचीन कालगणनेच्या नजरेतून जाणार्या वर्षाकडे पाहायला काहीच हरकत नाही. शिवपुराण आणि अन्य काही शास्त्रग्रंथांच्या आधारे ही कालगणना अशी आहे... |
|
Posted On : 27 Dec 2010 |
|
|
दत्तात्रेय-गोरक्ष संवाद |
|
पुढच्या आठवड्यात दत्त जयंती आहे. जटाजुट, भस्म, रुद्राक्ष अशी त्यांची अवधूतमूर्ती वैराग्याचे साक्षात प्रतीक. त्रिदेवांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांनी आपल्या मातेला अजपा साधनेचा उपदेश केला होता. शैव संप्रदायाच्या आणि नाथसंप्रदायाच्या या "अजपा गायत्री"ची सविस्तर माहिती आता आमच्या संकेतस्थळावर मराठीतूनही देण्यात आली आहे. गोरक्षनाथांनी गौरवलेली "न भूतो न भविष्याती" अशी ही सहज सोपी, कोणालाही करता येण्यासारखी पण अत्यंत प्रभावकारी साधना सर्वच योगसाधकांनी आचारावी अशी आहे. श्रीशंकराने दत्तात्रेयांच्या हस्ते मच्छेंद्रनाथांच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची गुढी उभारली अशी मान्यता आहे. त्यामुळे दत्त संप्रदायाबरोबरच नाथ संप्रदायातही दत्तात्रेयांना मानाचे स्थान आहे. याच विषयीची एक कथा पाहू... |
|
Posted On : 13 Dec 2010 |
|
|
योग्यांचे दहा नियम |
|
लेखमालेच्या मागील भागात आपण योग्यांच्या दहा यमांविषयी जाणून घेतले. या भागात आपण दहा नियमांविषयी जाणून घेणार आहोत. तप, संतोष, आस्तिक्य, दान, इश्च्वरपूजा, सिद्धांतवाक्य श्रावण करणे, लज्जा, मती, जप, हवन हे योगशात्रातील तज्ञांनी सांगितलेले दहा नियम आहेत. |
|
Posted On : 20 Nov 2010 |
|
|
दिवाळीच्या शुभेच्छा आणि एक गोष्ट |
|
आमच्या सर्व वाचकांना आणि योग साधकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयू, आरोग्य, एश्चर्य आणि आनंद प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! दीपावलीच्या शुभेच्छांबरोबरच गोरक्षनाथांची एक छोटी गोष्ट सांगणार आहे...
|
|
Posted On : 03 Nov 2010 |
|
|
योग्यांचे दहा यम |
|
स्वात्मारामाने आता दहा यम कोणते ते सांगितले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृति, दया, आर्जव, मिताहार, शौच हे दहा यम आहेत. सर्वच संस्कृतींमधे, देशांमधे अहिंसा, सत्य यांसारख्या गुणांना महत्वाचे स्थान आहे. योग्याच्या जीवनात तर ते काकणभर जास्तच महत्वाचे आहेत.
|
|
Posted On : 25 Oct 2010 |
|
|