RSS Feed




More...






Visit blogadda.com to discover Indian blogs


Untitled 1

ब्लॉगींग टिप 10 : कायदेशीर आणि नैतिकतेची बंधने पाळा

तुमचा ब्लॉग हे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे हे खरे पण हक्क म्हटला की कर्तव्येही आलीच. तुमचे ब्लॉगवरचे लेखन हे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत बसणारे असले पाहिजे. किंबहुना ही काळजी घेणे प्रत्येक लेखकाचे कर्तव्यच आहे. ही बंधने प्रामुख्याने खालील तीन प्रकरणांमधे मोडली जातात :

केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता, नोंदींची संख्या वाढवण्याकरता वा जाहिरातींद्वारे पैसा मिळवण्याकरता साहित्यचौर्यासारखे (Plagiarism) प्रकार जर कोणी लेखक करत असेल तर ते निंद्यच आहे. कॉपीराईट कायद्यान्तर्गत तर तो गुन्हा आहेच पण अशा लेखकाची नैतिक मुल्ये काय पातळीची असली पाहिजेत हे सुज्ञ वाचक तात्काळ ठरवू शकतात. कायद्यापुढे कोणत्याच गुन्ह्याच्या बाबतीत अज्ञानीपणा (किंवा तसा आव) हा बचाव ठरू शकत नाही हे पक्के लक्षात ठेवावे. त्यामुळे प्रत्येक लेखकाने कॉपीराईट कायदा समजावून घेणे महत्वाचे ठरते. कायदेशीर शिक्षा हा एक भाग झाला पण एक लेखक म्हणून अशी व्यक्ती आपली विश्वासार्हता कायमची गमावून बसते.

हाच नियम ब्लॉगवर ज्याप्रकारचे लेखन तुम्ही करत आहात त्याला लागू होतो. ब्लॉग हे लेखकाच्या मालकीचे व्यासपीठ असले तरी याचा अर्थ असा नव्हे की त्याने काहीही आणि कसेही लिहावे. मतभेद प्रगट करण्याचा वा टिका करण्याचा अधिकार जरी प्रत्येकाला असला तरी तो सभ्यतेच्या मर्यादा पाळून वापरणे अपेक्षित आहे. लेखकाने लक्षात ठेवले पाहिजे की वाचकवर्ग हा फार सुज्ञ आणि शहाणा असतो. नैतिकतेला सोडचिठ्ठी दिलेल्या लेखनावरून तो लेखकाची किंमत करत असतो. अशा लेखनाचा परिणामही लेखकाची विश्वासार्हता गमावण्यात होतो.

काही वेळा असे होते की लेखक आपली मते नैतिकतेच्या मर्यादा पाळून व्यक्त करतो पण एकादा वाचक प्रतिक्रियांद्वारे असभ्य भाषेत मते प्रदर्शित करतो. काही वेळा असेही होते की दोन वाचकांची असभ्य प्रतिक्रियांद्वारे आपापसात जुंपते. अशा वेळी मुळ लेखकाने "ही अन्य कोणाचीतरी मते आहेत. मी काय करणार." असा दृष्टीकोन बाळगू नये. शेवटी इतर वाचक स्मरणात ठेवताना "तुमच्या ब्लॉगवर" अमुक अमुक वाचले असेच लक्षात ठेवत असतात. अगदी कायदासुद्धा तुम्हालाच जाब विचारेल कारण शेवटी ब्लॉग तुमचा आहे. जर कोणी अशी असभ्य भाषा वापरत असेल तर ब्लॉगचे "मालक" या नात्याने तुम्ही हस्तक्षेप करू शकता. अशा प्रतिक्रिया काढून टाकून संबंधित वाचकाला समज देण्याचा तुम्हाला अधिकार आहे.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+


Tags : संगणक आणि इंटरनेट
Posted On : 17 Oct 2010
Current Rating :
Rate this product :


This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape


Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Copyright & Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web