परिव्राजक
घर सोडले तेव्हा
फक्त चार भिंती मागे राहिल्या नव्हत्या—
'माझे' म्हणणारा प्रत्येक विचारही
शांतपणे मागे पडला होता.
त्यानंतर प्रत्येक पाऊल
हीच तपश्चर्या झाली;
प्रत्येक नदी झाली संध्या,
प्रत्येक वृक्ष झाला आश्रम.
हातात दंड होता,
आणि दिशा दत्ताच्या चरणांची.
ओठांवर वेद होते,
आणि हृदयात करुणेचा अखंड झरा.
स्वतःसाठी काहीच न मागणारा तो संन्यासी,
असंख्य जीवांच्या अंतःकरणात
गुरुतत्त्वाची ज्योत प्रज्वलित करून
निःशब्द पुढे निघून गेला;
त्याच्या पावलांचा नाद
अजूनही दत्त शोधणाऱ्यांच्या हृदयात ऐकू येतो.
प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यस्मृतीस विनम्र प्रणाम.
— बिपीन जोशी
तूर्तास इतकेच. तुमचा संकल्प स्पष्ट असो आणि मन शांत. या मनःपूर्वक सदिच्छेसह, मी लेखणीला विराम देतो आणि पुन्हा मौनाच्या अथांगतेत विलीन होतो.
© हा लेख कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे. लेखाची लिंक शेअर करू शकता परंतु कोणत्याही स्वरूपात पुनर्मुद्रण किंवा पुनर्प्रकाशन करण्यास परवानगी नाही.
प्रिय वाचकांनो,
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या वेब साईटवर योग-अध्यात्म विषयक लेखन प्रकाशित करत आहोत. हे लेखन अन्यत्र वापरण्याची किंवा पुनर्मुद्रित करण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून मूळ लेखकाचे नाव व स्रोत न देता प्रकाशित केले आहे. काहींनी तर ते स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे—हे साहित्यचौर्य निंदनीय आणि खेदजनक आहे. भारतीय कायदा योग्य वेळी कार्य करेलच, पण आम्ही आमच्या सुजाण वाचकांना विनंती करतो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा व्यक्तींशी आमचा कोणताही संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रकाशित होण्याचे एकमेव अधिकृत माध्यम आहे.
धन्यवाद.
— वेब टीम