अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

रंगहीन परमेश्वर असंख्य रंग निर्माण करतो

परमेश्वर जरी रंगहीन असला तरी तो आपल्या शक्तीने काही गूढ उद्देशाने असंख्य रंग निर्माण करतो. सरतेशेवटी तो हे जग आपल्यात विलीन करून टाकतो. तो परमेश्वर आम्हाला शुभ विचार प्रदान करो.
~ श्वेताश्वतर उपनिषद
परमेश्वर स्वतः जरी निर्गुण आणि निराकार असला तरी आपल्या शक्तीच्या सहाय्याने वैविध्यपूर्ण सजीव-निर्जीव सृष्टी उत्पन्न करतो. परमेश्वर असे का करतो हे एक गुढच आहे. हे गूढ उकलण्याकरता योगी आपल्या साधनेद्वारे अथक प्रयत्न करत असतो. गम्मत अशी की साधकाला जेव्हा हे गूढ कळते तेव्हा तो जीव न रहाता शिव बनलेला असतो. परिणामी त्या गूढाची उकल सांगण्याकरता परत येऊच शकत नाही. ते गूढ नेहमी गुढच रहाते. जगद्नियंता परमेश्वर जशी या विश्वाची निर्मिती आपल्या शक्तीच्या आधाराने करतो तसेच विलीनीकरणही घडवतो. जणू आपणच पत्त्याचा बंगला बांधावा आणि आपणच मोडावा तसा हा प्रकार असतो. परमेश्वराकडे मागण्यासारखी गोष्ट कोणती असेल तर ती ही की त्याने सर्वांना शुभ विचार अर्थात परमेश्वर प्राप्तीविषयी दृढ इच्छा प्रदान करावी.



लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 01 December 2014