The Secret of Breath — Rediscover the sacred rhythm of your breath. Cultivate inner silence that brings clarity, balance, and resilience in daily life.


देवाच्या डाव्या हाती : ई-बुक डाउनलोड करा

कुंडलिनी जसजशी सुषुम्ना मार्गाने सहस्राराकडे जाऊ लागेल तसतसे अद्भूत अनुभव येऊ लागतील. त्या मार्गावर बारा कलांनी युक्त सूर्य तुम्हाला प्रकाश दाखवेल. सोळा कलांनी युक्त चंद्र शीतल चांदणे पाडेल व दहा कलांनी युक्त अग्नी तुम्हास ऊब देईल. अनाहत नादरूपी मंगल वाद्ये तुमचे स्वागत करतील. लाल, पांढर्‍या, पिवळ्या, निळ्या रंगांची दैवी रोषणाई तुम्हाला विस्मित करेल.

दशम द्वारात अंगुष्ठामात्र पुरुष तुम्हाला प्रेमभराने आलिंगन देईल. शेवटी त्याच्याही पलिकडच्या सत-चित-आनन्द रूपी परमशिवाची अनुभूती येईल. जो स्वत: निर्गुण असून भक्तांसाठी सगुण रुपाने अवतरतो तो सदाशिव तुम्हाला अलगद कवेत घेईल.

जणू गगनात गगन, पाण्यात पाणी वा सोन्यात सोने मिसळावे तशी अद्वैतानुभूती तुम्हाला लाभेल. याहून मोठे सुख ते काय? मग तुम्हाला अध्यात्ममार्गावर अन्य काहीही जाणून घेण्याची गरज भासणार नाही.


देवाच्या डाव्या हाती ई-बुक डाउनलोड करा

अनुक्रमणिका

Sr. Chapter Name
पुस्तक वाचण्यापूर्वी...
1एक विचित्र घटना
2गुरुचा शोध
3मी नोकरी सोडतो
4त्र्यंबकेश्वरला दाखल
5कुंडलिनी जागृती
6अद्भुत स्वप्न आणि दीक्षा
7मी परत येतो
8नवी साधना आणि उत्फुर्त क्रिया
9कर्मयोग आणि नोकरीला कायमचा रामराम
10योगारूढ
11साधक प्रश्नावली
लेखकाची ओळख



लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक आणि लेखक असून मायक्रोसॉफ्टच्या वेब डेव्हलपमेंट तंत्रज्ञानात त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. मायक्रोसाॅफ्टतर्फे त्यांना "मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी योगाधिष्ठित जीवनशैलीचा अंगीकार केला असून निवडक साधकांना ते अजपा गायत्री व ध्यान-धारणा यांबाबत मार्गदर्शनही करतात. तंत्रज्ञान आणि योगमार्ग या दोन भिन्न वाटांचा सुवर्णमध्य साधत, ते गेली ३१ वर्षांहून अधिक काळ प्रोग्रामिंग, ध्यान-धारणा, लेखन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांत सक्रिय आहेत. आपल्या लेखनाद्वारे ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसोबतच योगविद्या आणि अंतःप्रज्ञेचे सूक्ष्म पैलू स्वतःच्या संकेतस्थळांवरून उलगडतात.

Posted On : 15 February 2026

Protected by Copyscape