अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

प्राण-अपानाचे अस्तित्व चैतन्यावर अवलंबून

देहधारी प्राण आणि अपान (श्वास आणि उच्छ्वास) यांमुळे जीवंत असत नाही. काही अन्य तत्व आहे ज्यावर या दोघांचे अस्तित्व अवलंबून आहे.
~ कठोपनिषद
सर्वसाधारणपणे आपण असे म्हणतो की श्वास चाललेत म्हणून जीवन सुरू आहे. परंतु सूक्ष्म विचार केल्यास असे आढळेल की श्वासोच्छवास मूळ जैविक उर्जेमुळे घडत आहे. योगशास्त्रानुसार ही ऊर्जा म्हणजे महाप्राण, चैतन्य किंवा शक्ति. या जैविक शक्तीवरच देहधार्‍याचे समस्त व्यवहार अवलंबून आहेत. जैविक ऊर्जा, पंचप्राण, कुंडलिनी ही सर्व आदिशक्तीचीच विविध रुपे आहेत. अजपा साधनेचा अभ्यास दृढ झाल्यावर असा अनुभव येतो की ध्यानाला बसल्यावर श्वासोच्छवास कमी-कमी होत आहेत आणि अत्यंत प्रगत योग्याच्या बाबतीत तर ते पूर्णतः थांबतात. हाच केवल कुंभक किंवा सहज कुंभक. असा समाधिस्थ योगी वरकरणी मृतप्राय दिसतो पण देहात "अन्य तत्व" असल्याने जीवंतच असतो.



लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 24 November 2014