अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

ब्रह्म जाणल्यावर जन्म-मृत्यू नाही

तप, इंद्रिय-निग्रह आणि निष्काम कर्म हे आत्मशुद्धीचे उपाय आहेत. समस्त वेद-शास्त्र या ज्ञानाचा स्त्रोत आहेत आणि सत्य हा त्याचा स्थायीभाव आहे. हे जाणून जो ब्रह्मलीन होतो तो जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून सुटतो.
~ केनोपनिषद
योग-अध्यात्मामार्गावर प्रथम कर्तव्य कोणते असेल तर ते शुद्धीकरण. शुद्धीकरण शारीरिक पातळीवर तर आवश्यक आहेच पण त्याही पेक्षा मानसिक स्तरावर ते अधिक आवश्यक आहे. या शुद्धीकरणाशिवाय खरी आध्यात्मिक प्रगति केवळ अशक्य आहे. मानसिक शुद्धीकरणाचे मार्ग कोणते? केनोपनिषद तीन मार्ग सांगते - तप, इंद्रिय-निग्रह आणि निष्काम कर्म. तप हे प्रामुख्याने शारीरिक अंग आहे ज्यामध्ये उपास, कठोर दिनचर्या, हठयोगाच्या शुद्धीक्रिया अशा उपायांचा यांचा समावेश होतो. इंद्रिय-निग्रह हा प्रामुख्याने मानसिक मार्ग आहे. पंचेंद्रियांवर ताबा मिळवणे अर्थातच अतिशय कठीण आहे. ती अनेक वर्षांची साधना आहे. निष्काम कर्म शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर परिणाम करणारा मार्ग आहे. आता प्रश्न असा की कशावरून वरील तीन मार्ग शुद्धी घडवतात? तर समस्त वेद-शास्त्र तसे सांगतात. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की वेद आणि शास्त्रग्रंथांचे रचनाकार स्वतः साक्षात्कारी होते त्यामुळे त्यांनी सांगितलेले ज्ञान निव्वळ पोकळ नसून स्वानुभवावर आधारलेले आहे. त्यामुळेच ते त्रिवार सत्य आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. हा सगळा आत्मशुद्धीचा खटाटोप कशासाठी? तर ब्रह्म जाणून घेण्यासाठी. ब्रह्म जाणून घेलले की मग जन्म-मृत्यूची बाधा होत नाही असे केनोपनिषदाचे सांगणे आहे.



लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 22 December 2014